होंडा हॉर्नेट 2.0 च्या किंमत वाढली; बाईक मध्ये बदल नाही…

होंडा हॉर्नेट 2.0

नवी दिल्ली : कोरोना नंतरच्या काळात देशातील आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. तर लसीकरण सुरू होण्याच्या बातमीने मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे लोकांकडून अनेक प्रकारच्या खरेदी केल्या जात आहे. तर नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदी देखील केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांकडून अनेक ऑफर आणि डिस्काउंट मध्ये वाहन खरेदी करण्याकडे कल असतो.

मात्र आता अशीच एक सूट दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. मिळत आहे. होंडा हॉर्नेट या गाडीची किंमत 1,268 इतकी वाढली आहे. दिल्लीमधल्या रेपसोल एडिशनची किंमत 1,30,195 तर सामान्य वेरिएंट ची किंमत 1,28,195 झाली आहे.

ही नवीन मोटरसायकल होंडा प्रीमियम लाईन- अपचा भाग आहे ज्यामध्ये दमदार १८४ सीसी इंजिन असून ही गाडी ऑगस्ट महिन्यात लॉन्च करण्यात आली होती. या गाडीने भारतात लॉन्च होताच 180-200 सीसी सैगमेंट मध्ये प्रवेश केला होता.

होंडा टू-व्हीलर्स ची नेकेड स्ट्रीटफाइटर स्टाइल ची नवीन हॉर्नेट 2.0 184 सीसी चे सिंगल-सिलेंडर, फ्यूल-इंजैक्टेड एयर-कूल्ड इंजन 8,500 आरपीएम वर 17 बीएचपी पावर आणि 6,000 आरपीएम वर 16.1 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कंपनी ने या बाइकचे इंजिन ला 5-स्पीड गियरबॉक्स दिला आहे. होंडा ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर या मोटरसाइकल ला अपडेट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या