सोनिया गांधीवर दबाव वाढला ; इकडे आड तर तिकडे विहीर

blank

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात भाजप शिवसेनाला बहुमत सिध्द करता आले नाही. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सत्तास्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाठींब्याशिवाय सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार नाही.

परंतु काँग्रेसचे दिल्लीतले नेते त्यासाठी अद्याप अनुकूल नसल्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही. दरम्यान, आज दिल्लीत काँग्रेस नेत्यांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी सोनिया गांधीवर दबाव आणल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकला आहे. तर दुसरीकडे सोनिया गांधीना जमिएत – ए – हिंद या संघटनेकडून पत्र आले आहे. या पत्रात ”धर्मांध शिवसेनेला महाराष्ट्रात पाठिंबा देऊ नये,” असे म्हटले आहे. यामुळे सोनिया गांधी यांच्यावरील दबाव वाढला आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे.

दरम्यान, आज दिल्लीत सोनिया गांधी, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, ए.के. अँटोनी यांच्यात बैठक झाली. परंतु त्याआधी काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींसमोर त्यांची ठाम भूमिका मांडली आहे. सत्तास्थापनेला उशीर झाल्यास मोठं नुकसान होईल, असेही त्यांनी सोनिया गांधींना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :