president election 2017- दलितच राष्ट्रपती का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगामी राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून बिहार राज्याचे राज्यपाल रामनाथ कोविद यांचे नावा घोषित केले आणि एक दगडात अनेक पक्षी मारले.संघ प्रणित सरकार दलित विरोधी नाही , फक्त ब्राह्मण चेहर्याव्यतिरिक्त जातीचे इतरही चेहरे असल्याचे दाखविले,विरोधी पक्षांना तिखट विरोध करावयास जागा ठेवली नाही ,पर्यायी उमेदवार शोधावयास विरोधकांच्या नाकी नउ आणले.
                   विरोधी पक्षांकडून दलितच चेहरा असावे असा उमेदवार शोधावयास गेल्यास सुशिलकुमार शिंदे ,प्रकाश अंबेडकर , मिरा कुमारी यापलीकडे उमेदवार नव्हते ,तसे बारामतीच्या साहेबांना आग्रह केला होता पण त्यांनी भविष्य काळ पाहता हाताने कूर्हाड मारून घ्यावयाचे टाळले.
 एकुण रालोआ चे १०,९८,९०३ पैकी जवळपास ६लाख मतदानाची जुळवाजुळव झाली आहे.घटक पक्ष व काही विरोधी पक्ष सोबत घेवून मजबूत विजय मिळविण्यासाठी प्रयत्न आहे,त्यामुळे रामनाथ कोविद हे नक्कीच निवडून येतील यात शंका नाही.
                    राष्ट्रपती पद हे तसे शोभेचे पद आहे,त्यास पंतप्रधान पदासारखे  ग्लैमर नाही.पण या पदासाठी बिगर राजकारणी असावा असे मानक आहे.त्यामूळे डॉ. कलाम हे रालोआचे राष्ट्रपती होऊन गेले  यावेळी अमिताभ बच्चन,रतन,टाटा,विजय भटकर अशा मंडळींचेही नाव आले पण  बहुमत असलेले.भाजपा.सरकारने ती आशा फोल ठरवत राजकिय पार्श्वभूमी असलेले भाजपाचे अनुसुचित जाती मोर्चा चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रामनाथ कोविद यांना उमेदवारी दिली.सर्वाधिक डिसायरेबल उमेदवार लालक्रुष्ण आडवानी यांना गुरु दक्षिणा देण्यात मोदी कमी पडले आणि त्यांना खडा बाजूला काढून टाकावा तसे केले आहे.साहजिकच नरेंद्र मोदींनी भन्नाट चाल खेळून पक्षांतरगतही चेकमेट करुन आपली एकाधिकारशाही मजबूत केली आहे.
                 कॉंग्रेसने  मा.लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचे नाव राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणुन घोषित केले आहे.दलित विरुद्ध दलित अशी सरळ लढत राष्ट्रपती पदासाठी होणार हे निश्चितच आहे.जसे कि या वेळी अनुसुचित जातीसाठी राष्ट्रपती पद,आरक्षित,आहे.भाजपा हिंदूत्ववादी चेहर्यावर दलितांना चुचकारण्याचा प्रयत्न करण्यासाठी कोविद यांना उमेदवारी दिली,पण मग कॉंग्रेसने मीरा कुमार या दलितच चेहरा उभा करणे हे सरळ अतिशय टोकाचे जातिय राजकारण या निमित्ताने राजकिय पक्षांचे  दिसून येते.म्हणजे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा किमान पुरोगामी, धर्मनिरपेक्ष पक्षांनी विचार करणे गरजेचे होते.तुम्ही जातिवादी तर आम्हीही कमी नाहित हे कॉंग्रेसने  दाखवून दिले आहे.
               दलित व्यतिरिक्त दोन्ही उमेदवारांची वेगळी ओळख आहे पण म्हणतात ना कितीही केले तरि जात जातच नाही,त्याचा प्रत्यय येत आहे.रामनाथ कोविंद यांना  दिल्ली उच्च न्यायलय व सर्वोच्च न्यायलयात येथे प्रदिर्घ वकिलीचा अनुभव आहे.दोन वेळा राज्यसभा सदस्य म्हणुन राहिले आहे. ते डॉ .बी.आर.अंबेडकर विद्यापीठ लखनऊ व भारतीय व्यवथापन संस्था,कोलकाता  (IIM-Kolkata) यांच्या व्यवस्थापन मंडळावर होते.संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.दलित शोषित ,मागासलेल्या वर्गासाठी ,महिलांसाठी मोफत वकिलीची सेवा दिली देतात इ.
            तसेच मिरा कुमारी या माजी लोकसभेच्या अध्यक्ष राहिल्या आहे,त्या माजी  पंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या.त्या वकिलीची पदवीधर आहेत.संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या कार्यकळात सामाजिक न्याय व सक्षमिकरण तसेच  खात्याच्या मंत्री होत्या.त्यानंतर दूसर्या कार्यकळात बिनविरोधपणे पहिल्या  महिला लोकसभा अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला.
           असे स्वताः ची वेगळी ओळख व  कार्य असुनही या उमेदवारांकडे फक्त दलित म्हणुन बघणे कितपत योग्य आहे.?

 

                                  लेखक
                     डॉ. सुनिलसिंग राजपुत
                              औरंगाबाद
( लेखकाच्या मताशी “महाराष्ट्र देशा ” सहमत असेलच असे नाही )