ते फुटीर कोण ?

वेबटीम : भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून अपेक्षेप्रमाणे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे विजयी झाले आहेत . या निवडणुकीत देशभरातून रामनाथ कोविंद यांना सात लाख दोन हजार ६४४ मते मिळाली आहेत. कोविंद यांच्या एकूण मतदानाचा टक्का हा एकूण ६५.६५ टक्के एवढी आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या यूपीए आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांना तीन लाख ६७ हजार ३४१ मते मिळाली.

कॉंग्रेस – राष्ट्रवादीची ६ मते फुटली

महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचा विचार करता  विरोधकांची किमान १० मते फुटली असल्याच प्राथमिक आकडेवारीवरून दिसून येत आहे . राष्ट्रपती निवडणुकीसाठी महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ पैकी २८७ मतदारांनी मतदान केलं. यात रामनाथ कोविंद यांना २०८ मते मिळाल्याच सांगितल जात आहे .  मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली. तर दोन मते अवैध ठरली आहेत. संख्याबळानुसार राज्यात काँग्रेसचे 42 आणि राष्ट्रवादीचे 41 मिळून 83 आमदार आहेत. मात्र काँग्रेसच्या उमेदवार मीरा कुमार यांना 77 मते मिळाली आहेत. म्हणजेच काँग्रेस – राष्ट्रवादीची  किमान सहा मते फुटली आहेत. दुसरीकडे निवडणुकी आधी काँग्रेसला पाठिबा देण्याचा दावा करणाऱ्या शेकाप, समाजवादी पार्टीसह बहुजन विकास आघाडी, एमआयएम, मनसे, भारीप आणि सर्व अपक्षांची मतेही भाजपाच्या पारड्यात पडली आहेत.

ते फुटीर कोणाचे ?

विधानसभेतील पक्षीय बलाबलाचा विचार करता कोविंद यांना भाजप १२२, शिवसेना ६३ आणि १३ अपक्ष  अशी एकूण १९८ मते मिळन अपेक्षित होत. पण कोविंद यांना एकूण २०८ मते मिळाली आहेत. तर मीरा कुमार यांना ७७ मते. या मतांच्या आकडेवारीचा विचार केल्यास कोविंद यांना  कॉंग्रेस राष्ट्रवादीची एकूण सहा मते तर अपक्ष तसेच इतर पक्षांची  ४ मते अधिक मिळाली आहेत. यावरून आता कॉंग्रेस किवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६  सदस्यांची मते फुटली असल्याच दिसून येत आहे . आता ही ६ मतं काँग्रेसची की राष्ट्रवादी काँग्रेसची असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून आपल केवळ एक मत फुटलं असल्याचा दावा केला जात आहे .

देशाच्या सर्वोच्च पदावर रामनाथ कोविंद यांची निवड