त्या ‘गोळी’वाल्यांनी मलाही फसवले – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली: आपण टीव्ही पाहत असताना कधी ना कधी ‘पेहले मी बहोत मोठा था’ अशा प्रकरच्या अनेक जाहिराती आपण पाहतो. अनेक वेळा या जाहिराती पाहून आपण ते प्रॉडक्ट मागवतो देखील, मात्र या सर्वात अनेकवेळा फसवणूक देखील केली जाते. आता खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीदेखील अशा कंपन्यांकडून आपली फसवणूक झाल्याच सांगितल आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी काल राज्यसभेत खोट्या जाहिरातींमुळे होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दा मांडला. यावर बोलताना अशाप्रकारे आपलीही फसवणूक झाल्याचे नायडू यांनी सांगितले. ते म्हणाले ‘काही दिवसांपूर्वी मी टीव्हीवर वजन कमी करण्याच्या प्रॉडक्टची एक जाहिरात पाहिली, त्यानंतर गोळ्या मागवण्यासाठी 1230 रुपये पाठवले. काही दिवसांनी एक इमेल आला, ज्यामध्ये वजन कमी करण्यासाठी दुसऱ्या प्रकारच्या गोळ्या घ्यायच्या आहेत त्यासाठी 1000 रुपये पाठवावेत असे लिहिले होते’.

दरम्यान जाहिरातदार कंपनीकडून फसवणूक झाल्यावर आपण केंद्रीय कंझ्युमर अफेअर्स मंत्री रामविलास पासवान यांना पत्र लिहून याची माहितीही दिल्याचेही नायडू यांनी सांगितले.