राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडला देणार भेट; छत्रपती शिवाजी महाराजांना करणार अभिवादन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडला देणार भेट; छत्रपती शिवाजी महाराजांना करणार अभिवादन

president ramnath kovind

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबर रोजी दुर्गराज रायगडावर येणार आहेत. याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रपती (Sambhajiraje Chhatrapati)रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांना रायगड भेटीसाठी निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले आहे. आपल्या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती कोविंद ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत. हि आपल्या सर्वांसाठीच गोरवास्पद बाब आहे.असे ट्वीट संभाजीराजे यांनी केले आहे.

दरम्यान यापूर्वी ५ जानेवारी २०१४ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. मोदी यावेळी प्रथमच रायगडच्या दौऱ्यावर आले होते. आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड दौरा करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या