शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते झाले लोकार्पण

मुंबई ते शिर्डी अवघ्या ३५ मिनीटांत

शिर्डी:- बहुप्रतीक्षित शिर्डी विमानतळचे अखेर आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय हवाई मंत्री पी.अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते.

shirdi air port1

bagdure

सुमारे १९९०च्या दशकात शिर्डी हे हवाई मार्गाने जोडले जावे अशी मागणी पुढे आली होती. आता विमानतळाचे काम पूर्ण होऊन लोकार्पण सोहळाही पार पडल्यामुळे शिर्डीकरांचे हे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. आतापर्यंचा विचार करता शिर्डीला जायचे म्हटले तर, मुंबईपासून, सुमारे पाच- साडेपाच तास, तर औरंगाबादहून तीन तास प्रवास करुन शिर्डीला जावे लागत असे. मात्र, आता हवाई मार्गाचा वापर केल्यास मुंबई ते शिर्डी हे अंतर अवघ्या ३५ मिनीटांत कापता येणे शक्य आहे.

साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या ध्वजारोहण व शिर्डी विमानतळाच्या लोकार्पणासाठी राष्ट्रपती कोविंद यांचे शिर्डीत सकाळी आगमन झाले.राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर राष्ट्रपतींनी १० वाजून ०५ मिनिटांनी शिर्डी विमानतळाचे लोकार्पण केले. लोकार्पण सोहळ्यानंतर १० वाजून १० मिनिटांनी शिर्डी विमानतळावरून पहिल्या विमानाने उड्डाण केले.

You might also like
Comments
Loading...