‘तिहेरी तलाक, हलाला यांसारख्या कुप्रथा संपुष्टात आल्या पाहिजेत’

blank

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशानाला संबोधित केले. यावेळी बोलताना महिलांच्या आरोग्य आणि विकासाबद्दल मत व्यक्त केले. उज्वला योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांची धुरापासून मुक्ती झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले. तर तिहेरी तलाक, हलाला यांसारख्या कुप्रथा संपुष्टात आल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाला सकाळी ११ वाजता सुरूवात झाली. यावेळी सर्वप्रथम राष्ट्रपतींनी संसदेत निवडूण आलेल्या सर्व सदस्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींनी दोन्हा सभागृहांच्या संयुक्त बैठकीत केलेल्या अभिभाषणात संरक्षण, शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था याविषयी विचार व्यक्त केले. महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असून सरकार त्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. शेतकरी देशाचा अन्नदाता असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशातील सर्व शेतकऱ्यांचा विकास साधण्याचे सरकराचे उद्दीष्ट असल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले.