राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी के जे. येसुदास, सद्गुरू जग्गी वासुदेव, पंडित विश्वमोहन भट्ट यांना पद्मविभुषण, समाजसेवेसाठी अप्पासाहेब धर्माधिकारी, पाककलेसाठी संजीव कपूर यांना, खेळासाठी दीपा कर्माकर, साक्षी मलिक, तर गायक कैलाश खैर यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारीता क्षेत्रासाठी चो रामास्वामी यांना मरणोत्तर पद्मविभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.