राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या

अहिंसेची शिकवण देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अहिंसा, सत्य, करुणा याबाबत भगवान महावीरांनी शिकवलेलं तत्वज्ञान आजही समाजाला उपयोगी असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.