जिल्हा परिषद अध्यक्षा-उपाध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा

Ahmednagar Zilla Parishad

अहमदनगर :- जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील व उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी निंबोडी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे.

Loading...

निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गाचे छत कोसळून 3 विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यु झाला तर अनेक विद्यार्थी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. प्रसिध्द केलेल्या निवेदनात वाकचौरे यांनी म्हटले आहे की,जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या इमारतींचे बांधकाम करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची असते.

बांधकाम विभागाने केलेल्या कामाचा दर्जा कधीही तपासला जात नाही.जिल्हा परिषदेतील सत्ताधारी सातत्याने अधिकार्यांना पाठिशी घालतात. प्रशासनाच्या हलगर्जी पणानेच तीन लहान बालकांचा मृत्यु झाला आहे.या भयानक घटनेमुळे संपूर्ण जिल्हा अक्षरश: हादरला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील शाळांच्या खराब झालेल्या इमारतींची तातडीने दुरूस्ती करणे गरजेचे असतांना त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील व उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी या दुर्देवी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा,अशी मागणी भाजपा गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे.

तसेच या घटनेतील मृत विद्याथ्र्यांंच्या पालकांना प्रत्येकी 10 लाख रूपये व जखमी विद्याथ्र्यांना उपचार व पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दिली जावी, अशी मागणी देखील वाकचौरे यांनी केली आहेLoading…


Loading…

Loading...