साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांची संतप्त शिर्डीकरांनी गाडी फोडली

शिर्डी : साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांची संतप्त शिर्डीकरांनी गाडी फोडली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी निधी म्हणून साई संस्थानाकडून 50 कोटी रुपये देण्यास ग्रामस्थांनी विरोध करत दंडूके मोर्चा काढला होता. यावेळी संतप्त आंदोलकांनी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या गाडीचीही तोडफोड केली.

साई भक्तांसाठी खुशखबर…

साई संस्थानावर भाजप प्रणीत विश्वस्त मंडळ आल्यापासून साई बाबांना येणारे दान विदर्भातील शाळा आणि रूग्णालये यांना देण्यात आले. मोदींच्या कार्यक्रमासाठी तसेच, आरएसएसच्या कार्यक्रमासाठी देखील कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप ग्रास्थांनी केला आहे.

शिर्डीत भाविक-सुरक्षा रक्षकांत हाणामारी

शिर्डीतील विविध पक्षातील लोकांनी एकत्र येत साई संस्थान विश्वस्तांच्या विरोधात दंडूके मोर्चा काढला. यावेळी अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक साई निवास या इमारतीजवळ पोहोचले. पोलिसांनी आंदोलकांना विश्वस्त मंडळाच्या बैठकी पर्यंत जाण्यापासून रोखले. त्यामुळे संतप्त आदोलकांनी बाहेर उभी असलेली अध्यक्ष हावरे यांची गाडी फोडली.यावेळी 17 आंदोलकांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले.

शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते झाले लोकार्पण