fbpx

कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघअध्यक्षपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे

नाशिक : नाशिक जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहघ मर्यादित संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे तर उपाध्यक्षपदी अनंतराव बोराडे यांची बिनविरोध निवड झाली. संघाच्या कार्यालयात काल जिल्हा सहनिंबधक श्रीमती सौदांने यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचीत संचालक मंडळाची बैठक झाली. बैठकीत अध्यक्षपदी डॉ. कुंभार्डे यांचा तर उपाध्यक्षपदासाटी बोराडे यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने निवडणुक अधिकारी सौदांने यांनी अध्यक्षपदी डॉ. कुंभार्डे तर उपाध्यक्षपदी बोराडे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. शेतकरी हितासाठी स्थापन झालेल्या संस्थाचा विकास करणे बाकी असून सर्व संचालकांना विश्वासात घेऊन विकासात्मक काम करणार आहेत. संघातून खरेदी व विक्रीतून उलाढाल होते मात्र, कांदा -बटाटा यांची चांगल्या दर्जाची बियाणे विक्री शेतकऱ्यांसाठी करणार. प्रत्येक तालुक्यात कांदा व बटाटा संघाचे कार्यालयासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू.डॉ. आत्माराम कुंभार्डे (नवनिर्वाचीत अध्यक्ष जिल्हा कांदा-बटाटा संघ