नागरिकत्व सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

Ramnath-kovind

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी या विधेकाचं स्वागत केले. तसेच त्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या खासदारांचे आभार मानले. तसेच या विधेयकाला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक आधी लोकसभा त्यानंतर राज्यसभेत मंजुर झाल्यानंतर आता या विधेयकाला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता नागरिकत्व संशोधन विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे.

तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला रात्री उशिरा मंजुरी दिली. नागरिकत्व सुधारणा विधेयक राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता नागरिकत्व संशोधन विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे.

दरम्यान, या विधेयकामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील सहा समुदायातील लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि इसाई या सहा समुदायातील लोक जे 31 डिसेंबर, 2014 आधी भारतात आले आहेत, त्यांना सरसकट भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या