राष्ट्रपती कोविंद करणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन

राष्ट्रपती कोविंद

अहमदाबाद : इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सध्या भारत-इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचे दोन सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये होणार आहेत. नव्याने बांधण्यात आलेलं मोटेरा स्टेडियम हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये एकावेळी 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसू शकतात.

या स्टेडियममध्ये होणाऱ्या पहिल्याच टेस्ट मॅचसाठी बीसीसीआय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना बोलावण्याच्या तयारीत आहे. मोटेरा स्टेडियमवर होणारी तिसरी टेस्ट मॅच डे-नाईट असणार आहे. मागच्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्टेडियमचं उद्घाटन केलं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना याच स्टेडियममध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम झाला होता.

दरम्यान, या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरूवात होण्याआधी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मोटेरा स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे.स्टेडियममध्ये तब्बल ७६ वातानुकूलीन कॉरपोरेट बॉक्स तयार करण्यात आले आहेत.मोटेरा स्टेडियम ६३ एकरात उभारण्यात आला आहे.स्टेडियममध्ये ११ खेळपट्ट्या आहेत.स्टेडियममधील खेळपट्ट्या लाल आणि काळ्या मातीने तयार करण्यात आल्या आहेत.

खेळाडूंसाठी खास वेगळे ड्रेसिंग रुम तयार करण्यात आले आहे. याला जोडूनच जिम देखील आहे.मोटेरा स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रुम आहेत. इनडोर आणि आऊटडोर सरावाची सुविधा या स्टेडियममध्ये आहे. स्टेडियममध्ये एलईडी फ्लडलाइट लावण्यात आले आहेत. यामुळे उंचावरील चेंडूवर खेळाडूला नजर ठेवणे सोपे जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या