जाणून घ्या नवनिर्वाचित चार खासदारांची कारकीर्द 

अपंग विधेयक

टीम महाराष्ट्र देशा : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनू आगा आणि अभिनेत्री रेखा यांचा कार्यकाळ संपला होता. राष्ट्रपतीनियुक्त करत असलेल्या 12 पैकी चार जागा जागा रिकाम्या झाल्या होत्या त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज निवड केली आहे. त्यामध्ये राम शकल,  राकेश सिन्हा,  रघुनाथ मोहापात्रा आ सोनल मानसिंग यांचा सहभाग आहे. हे या चारही दिग्गज अपाआपल्या क्षेत्रात माहीर आहेत. विशेष म्हणजे यावेळी चित्रपट आणि खेळाशी निगडीत असलेल्या एकाही दिग्गज व्यक्तीला राज्यसभेवर पाठवले नाही.

वाचा कोण आहेत हे चार खासदार 

सोनल मानसिंह : सोनल मानसिंह या शास्त्रीय नृत्यअभ्यासक नृत्यांगना असून भरतनाट्यम व ओडिसी नृत्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांच्या आई गुजरातमधील एक ख्यातनाम समाजसेविका होत्या तर आजोबा स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यपाल होते. मानसिंह यांनी मणिपुरी नृत्यापासून आपल्या शिक्षणाची नागपूरयेथून सुरुवात केली. त्यांनी संस्कृत भाषेतील प्रवीण व कोविद या पदव्या संपादन केल्या आहेत. 1962 साली त्यांनी नृत्यातील करिअरला सुरुवात केली. त्यांना पद्मभूषण, संगीत-नाटक अकादमी, कालिदास सन्मान असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

राकेश सिन्हा : राकेश सिन्हा हे मूळचे बिहारचे बेगुसराईचे असून त्यांचे शिक्षण पाटणा व रांची येथे झाले. त्यांचे अनेक लेख जनसत्ता, हिंदुस्तान, दिनमान, रविवार, ऑर्गनायझर, पांचजन्य व अनेक प्रादेशिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ते दिल्ली विद्यापिठात प्राध्यापक असून इंडिया पॉलिसी फाऊंडेशनचे मानद संचालक आहेत. टीव्हीवरील अनेक चर्चांमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बाजू मांडली आहे.

राम शकल : राम शकल हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. ते माजी खासदार असून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरुन उत्तर प्रदेशातील रॉबर्ट्सगंज मतदारसंघातून तीनवेळा लोकसभेत निवडून गेले होते.

रघुनाथ महापात्रा : रघुनाथ महापात्रा हे ओडिशातील एक सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आणि शिल्पविशारद आहेत. त्यांचा जन्म 23 मार्च 1943 साली झाला. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हस्तकला क्षेत्र तसेच कलाशिक्षणामध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे.

मोदींच्या सभेत आंदोलनाची भीती; काळे कपडे परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनाच सभेत मज्जाव!