President election- … यांना राष्ट्रपती करा- रामदास आठवले

मुंबई : सध्या देशभरात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून भाजपला शह देण्यासाठी वेगवेगळ्या शक्यता पडताळल्या जात आहेत. तर सत्ताधारी भाजपने अजून आपल्या उमेदवाराचे नाव गुपितच ठवले आहे. एनडीएच्या सर्व घटक पक्षांची मोट बांधण्याचं काम भाजप नेत्यांकडून करण्यात येतय.

आता राष्ट्रपतीपदासाठी जर शरद पवार यांच्या नावाचा विचार झाला तर आम्हाला आनंद होईल, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.  हा प्रस्ताव घेऊन रामदास आठवले यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांची भेट घेतली आहे. अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी रामदास आठवलेंनी शहांची भेट घेतली.

शरद पवार राष्ट्रपती झाले तर राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. शिवसेना पाठिंबा काढणार नाही. अनेक आमदार आपल्याला पाठिंबा देतील. कोणालाही राज्यात निवडणूक नकोय, मी अमित शहांना सांगितल्याचं रामदास आठवले म्हणाले आहेत.