हे आहेत राष्ट्रपती पदाचे उमेदवार

गेल्या वर्षभरापासून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारा बाबत वेगवेगळे तर्क लावले जातात होते. कधी शरद पवारांचे नाव तरी कधी दुसऱ्या कोणाचे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा राजकीय चाणक्याच्या तर्क-वितर्काना धक्का देत आज बिहारचे विद्यमान राज्यपाल जेष्ठ नेते रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी जाहीर केले आहे.   भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सामाजिक कार्य मोठं आहे. त्यामुळे  राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीव म्हणून एनडीएने त्यांच्या नावाला पसंती दिल्याचं अमित शहा यांनी सांगितलं आहे. त्याच बरोबर कोविंद यांच्या उमेदवारी बाबत सर्व पक्षीयांशी चर्चा केल्याची शहा यांनी सांगितल.

 
रामनाथ कोविंद यांची थोडक्यात माहिती!

रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी झाला

कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण घेतले आहे.

1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली केली .

1994 ते 2000 तसेच 2000 ते 2006 पर्यंत राज्यसभेचे सदस्य

8 ऑगस्ट 2015 पासून बिहारच्या राज्यपालपदी.