एकमेकांपासून दुरावलेले उस्मानाबादचे आजी-माजी खासदार एकत्र!

omraje nimbalkar

उस्मानाबाद: जिल्ह्यात शिवसेनेचा जम बसवणारे माजी खासदार रविंद्र गायकवाड यांना मागच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाअंतर्गत डावपेचामुळे उमेदवारी नाकारण्यात आली होती. उमेदवारी नाकारली त्यामुळे अनेक नाराज झालेल्या शिवसैनिकांनी उमेदवारी मिळवलेल्या ओमराज निंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे उघड नाराजी व्यक्त करत निवडणूकीत धारसोडीचे नाट्य केले होते. तेव्हा पासून नाराज असलेले तसेच एकमेकांपासून दुरावलेले एक आजी-माजी खासदार अचानक एका कार्यक्रमात एकत्र दिसल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या आहेत.

रविवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे दोघे नेते एकत्र आले होते. उमरगा – लोहारा तालुक्याच्या राजकारणात शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे प्राबल्य आहे. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील आणि माजी खासदार गायकवाड या दोन नेत्यांची ‘हवा’ गेल्या तीन दशकापासून राजकारणात आहे. मात्र उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर दोघांनी राजकारणात स्थैर्य निर्माण करण्यासाठी पर्याय शोधला. बसवराज पाटील यांनी औसा विधानसभा, तर गायकवाड यांनी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत यश मिळविले.

मागच्या लोकसभा निवडणूकीत निंबाळकर यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली आणि तेव्हा पासून निंबाळकर आणि गायकवाड दूर झाले होते. या अंतर्गत राजकारणात आमदार ज्ञानराज चौगुले यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतरच्या दोन वर्षात गायकवाड आणि खासदार ओमराजे एकत्र येत नव्हते. मात्र रविवारी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात दोघे एकत्र आले होते. श्री.गायकवाड यांच्याबद्दल आदर व्यक्त करत खासदार निंबाळकर, आमदार चौगुले आणि कळंबचे आमदार कैलास पाटील चौघेही गायकवाड यांच्या वाहनात कार्यक्रमास्थळी आल्याचे चित्र उपस्थितीतांना आश्वर्याचे वाटत होते. मात्र आता एक प्रश्न अनेकांच्या मनात व्यक्त होत आहे, हे खरंच एकत्र आलेत की हा पण कुठला डावपेच?

महत्वाच्या बातम्या

IMP