Maharashtra Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यामध्ये (Maharashtra) वातावरणात (Weather) चांगलाच बदल होत आहे. ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात अनेक ठिकाणी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. यामध्ये अहमदनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, परभणी आदी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. तर, पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडल्याचे चित्र दिसत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण राज्यातील अनेक ठिकाणी पुढील 48 तास जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या 3-4 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तुर पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, हवामान खात्याने जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये आधीच थंडीचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये काल संध्याकाळी वर्धा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका अजूनच वाढला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोसमी पिकांना फटका बसला आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला. अहमदनगर मधील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये देखील काल मुसळधार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. तर, नांदेड जिल्ह्यातील रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना तूर, कापूस इत्यादी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा
- Nitesh Rane | “..तर आदित्य ठाकरेंसह आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये असते”; नितेश राणेंचा पवारांवर पलटवार
- Prakash Ambedkar | “काँग्रेसने आम्हाला चेपलं, आता उद्धव ठाकरेंनी ठरवावं की…”; शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया
- Breaking News | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उद्या अचानक दिल्ली दौऱ्यावर, राजकीय घडामोडींना वेग
- Devendra Fadanvis | चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश