मुघल गार्डनचे नाव बदलून ‘डॉ.राजेंद्र प्रसाद’ करण्याची हिंदू महासभेची मागणी

नवी दिल्ली  : राष्ट्रपती भवानातील मुघल गार्डनचे नाव बदलून डॉ.राजेंद्र प्रसाद उद्यान करण्यात यावे,अशी मागणी हिंदू महासभेने केली आहे. या संदर्भात हिंदू महासभेने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्र पाठविले आहे.देशात विविध ठिकाणांना दिलेली मुघल राज्यकर्त्यांची नावे बदलून त्या ठिकाणांना, वास्तूंना देशातील महापुरुषांची नावे देण्यात यावी,अशी मागणीही महासभेने केली आहे. यापूर्वीही मुघल गार्डन आणि अन्य वास्तूंच्या नावात बदल करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींकडे पत्राच्या माध्यमातून मागणी केली होती, असे हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणि यांनी सांगितले.