धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आधार महोत्सवाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी

परळी : विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित आधार महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलेली असून, या आधार महोत्सवाच्या निमित्ताने समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांना मदत करण्याचा निर्धार आज झालेल्या बैठकीत करण्यात आला.

परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज या संदर्भात झालेल्या बैठकीत आधार महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. यावेळी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, ज्येष्ठ नेते सुरेश टाक यांनी मार्गदर्शन केले.

Loading...

दि.१५  जुलै हा धनंजय मुंडे यांचा वाढदिवस तर दि.२२ जुलै हा माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार वाढदिवस आहे. या दोन नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ७ दिवसांच्या या महोत्सवात दि.१५  जुलै रोजी मतदार संघातील गरीब विद्यार्थ्यांना १ लाख वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सकाळी नटराज रंग मंदिर परिसरात महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१६  जुलै रोजी याच ठिकाणी दिव्यांगांना वॉकर, व्हिल चेअर, श्रवणयंत्र वाटप व वृक्ष भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दि.१७  जुलै रोजी शहरातील मोंढा मैदानात ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख – इंदोरीकर यांचे समाजप्रबोधनपर किर्तन, दि.१८ जुलै रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, दि.१९  जुलै रोजी वॉटर व्हिलरचे वाटप, तर दि.२०  जुलै रोजी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त नामांकित कलावंतांचा एकांकिता महोत्सव होणार आहे. दि.२१  जुलै रोजी मेंदुची कार्यशाळा या विषयावर प्रा.बाळासाहेब कच्छवे यांचे प्रबोधनात्मक मार्गदर्शन तर दि.२८ जुलै रोजी भव्य नौकरी महोत्सव होणार आहे. या शिवाय दि.२२  जुलै रोजी नामवंत कवींच्या महाकवी संमेलनाचे ही आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’