पावसाळ्यातील आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

Devendra fadnvis pune

गतवर्षी पावसाळ्यामध्ये आलेल्या आपत्ती व अडचणींना तोंड देत यावर्षी त्यावर मात करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. शासनाच्या विविध यंत्रणांनी या काळात अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व पावसाळा पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्यापूर्वीच्या तयारीबाबत विविध यंत्रणांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. याबैठकीत मुंबई महापलिका, हवामान विभाग, भारतीय सेना, भारतीय वायू सेना, भारतीय नौसेना त्याचबरोबर राज्यातील विभागीय आयुक्त यांनी आपत्ती निवारणासाठी घेतलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन आदी उपस्थित होते.