स्वबळाच्या तयारीला लागा ; अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश

टीम महाराष्ट्र देशा : युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे. अमित शाह यांनी मुंबईत येऊन महाराष्ट्र आणि गोव्यातील विस्तारक आणि पदाधिकाऱ्यांशी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी भाषण न करता पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधण्यावर भर दिला.

अमित शाह यांनी स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा घेतला. यामुळे कार्यकर्त्यांचे एकाधिकारशाहीचे आरोप पुसत पक्षात लोकशाही पद्धतीने काम होत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विस्तारकांवर बूथ रचनेची प्रमुख जबाबदारी असून ‘एक बूथ 25 युथ’ नुसार नेमणुका करण्यास अमित शाह यांनी सांगितले. तसेच, प्रत्येक बूथ प्रमुखाला 23 सूत्री कानमंत्र देण्यात आला असून, त्यानुसार वेळबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.

सुपरस्टार रजनीकांतचा एकत्र निवडणुक घेण्यास पाठींबा

सध्याच्या सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव : भुजबळ