fbpx

शिवसेनेला सोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू – देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिवसेनेला सोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू, मात्र शिवसेनेसोबत युती न झाल्यास भाजप निवडणुकांना स्वबळाबर समोर जाईल. कारण शिवसेनेशिवायही आपण जिंकू शकतो हे पालघरने दाखवून दिले आहे. असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलतं होते.

ते पुढे म्हणाले की, भाजप विरोधात सर्व विरोधीपक्ष एकवटले आहे. त्यामुळे सत्तेचा मार्ग निश्चित बिकट झाला आहे. मात्र आपल्याला या सर्व आव्हानाला तोंड देतं विजय मिळवायचा आहे. त्यासाठी कामाला लागा. जनता आपल्याला निश्चितचं आपल्या कामाची पोचपावती देईल, आणि पुन्हा एकदा केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार पूर्ण बहुमताने येईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.