उजनी दुहेरी जलवाहिनी स्वत: टाकण्याची पालिकेची तयारी

सोलापूर : शहराततीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांची ओरड सुरू आहे. रोज पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी ते सोलापूर नवीन जलवाहिनी घालण्याशिवाय पर्याय नाही. या जलवाहिनीबाबत मागील पाच वर्षांपासून चर्चा सुरू आहे. यावर महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी तोडगा काढला आहे. महापालिका स्वत: दुहेरी जलवाहिनी टाकण्यासाठी ६९२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. ते जानेवारी महिन्याच्या महापालिका सर्वसाधारण सभेत येण्याची शक्यता आहे. एनटीपीसीकडून २५० तर स्मार्ट सिटीतून २०० कोटी आणि महापालिका ४२ कोटी असे ४९२ कोटींच्या कामातून प्रथम टप्प्यात काम करण्याचे नियोजन आहे. शहरास रोज १३५ एमएलडी पाण्याची गरज राेज पाणीपुरवठा करण्यासाठी आहे. टाकळी, हिप्परगा आणि उजनी या तीन ठिकाणांहून रोज १०९ एमएलडी पाणी उपलब्ध होते. पण शहरातील वितरण व्यवस्थेमधील त्रुटीमुळे तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो. उपलब्ध पाणी आणि लागणारे पाणी यांचे गणित अनेक अधिकाऱ्यांनी मांडले. पण यश आले नाही. त्यावर नवीन जलवाहिनीचा पर्याय समोर आला. त्यानुसार महापालिका आयुक्त डाॅ. ढाकणे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शासकीय मदतीविना काम करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तो सभागृहाच्या मान्यतेसाठी जानेवारी महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे आणण्याचा प्रयत्न आहे. तांत्रिक अडचण आल्यास फेब्रुवारी महिन्याच्या सभेत येईल.
=====

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...