भिमा पाटस गाऴपाची तयारी सुरु

सचिन आव्हाड/ दौंड : तालुक्यातील सभासदांच्या मालकीच्या असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2018-2019 गळीत हंगामाची जोरदार तयारी सुरू असून कारखान्यातील सुरू असलेल्या कामांची पाहणी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल व संचालक मंडळाने नुकतीच केली.

मागिल गळीत हंगामात एेनवेळी कारखाना सुरू सुरू करण्याचा निर्णय झाला.कामगार व अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे कारखान्यातील यंत्रणेच्या दुरूस्तीची कामे वेळेवर पार पडली. मागील हंगामात सुमारे 3 लाख 90 हजार मे.टन ऊसाचे गाळप करून सुमारे 3 लाख 89 हजार मे टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले होते . 2000 रूपये टना प्रमाणे शेतकऱ्यांंच्या खात्यावर ऊसाचे पैसे वर्ग करण्यात आले असून तोडणी,वाहतुकदार, कंत्राटदार, कामगार यांचे देणी देण्यात आली आहे.

यंदाच्या गळीत हंगामाची वेळेतच तयारी सुरू झाली असून मिल,बाँयलर,बाँयलींग हाऊस,को-जनरेशन प्रकल्प यांची दुरूस्ती व देखभालीची कामे वेगात सुरू आहेत.या कामांची पहाणी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी केली.यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही सुचना कुल यांनी केल्या. यावेळी कार्यकारी संचालक आबासाहेब निबे,उपाध्यक्ष नामदेव बारवकर,संचालक विकास शेलार,चंद्रकांत नातु,तुकाराम ताकवणे,विनोद गाढवे,आबासो खळदकर,माणिक कांबळे, तुकाराम अवचर,हेमंत कदम,पंढरिनाथ पासलकर,एम.डी. फरगडे, माऊली ताकवणे आदी उपस्थित होते.

यंदाच्या गळीत हंगाची तयारी वेगात सुरू आहे.शेतकर्यांचे ऊसाचे वेळेवर गाळप व्हावे यासाठी कारखाना कटिबद्ध असून 400 ट्रक्टर,350 बैलगाडी,150 ट्रक्टर गाड्यांचे करार झाले असून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. अशी माहिती आमदार राहूल कुल यांनी दिली.

स्वबळाच्या तयारीला लागा ; अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश

अजय देवगन आणि काजोल तब्बल 8 वर्षांनंतर दिसणार एकत्र

You might also like
Comments
Loading...