fbpx

भीमा कोरेगाव दंगलीचा पूर्वनियोजित कट ; पृथ्वीराज चव्हाण

prithviraj

पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दगडफेकीनंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राज्याच गृहीमंत्री पद असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकीय विरोधाचा सामना करावा लागत आहे. मुखमंत्री दोन समाजात तेढ निर्माण करण्यात यशस्वी झाल्याच विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद असलेल्या ‘डॉयलॉग अँड डायलेक्टिक-अ सेक्युलर परस्पेक्टिव्ह’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

कोरेगाव भीमा येथील घटनेला या वर्षी २०० वर्ष पूर्ण झाले होते. त्यामुळे विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी भीमा कोरेगाव येथे येतील याची पूर्व कल्पना सरकार आणि प्रशासनाला होती. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय नेत्यांना निमंत्रित करून या घटनेला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले. तसेच अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन कोरेगाव भीमा शोर्यदिन साजरा करण्याचे योजिले होते. हे सर्व लक्षात घेता त्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते. मात्र दंगल घडू नये हि घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यात मुख्यमंत्री अपयशी झाल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

चव्हाण पुढे म्हणाले, भीमा कोरेगाव येथे दरवर्षी अनुयायी मोठ्या संखेने येतात. मात्र याचा वर्षी दंगल का झाली? सरकारने कोणतेही नियोजन केले नसल्यामुळे कोणी तरी दंगलीचा पूर्वनियोजित कट रचला असावा, अशी शंका व्यक्त केली. मुंबईला चैत्यभूमी येथे आणि नागपूरला दीक्षाभूमी येथे दरवर्षी लाखो लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. त्यावेळी कोणताही गोंधळ किंवा वाहतूक कोंडी होत नाही. असे नियोजन कोरेगाव भीमा येथे आवश्यक होते. दगडफेक कोणी केली हे माहित असूनही सरकार काहीच बोलायला तयार नाही. तसेच सीसीटीव्ही फूटेज पाहिले किंवा दंगलीच्या व्हीडीओमध्ये सर्व प्रकार सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ असूनही कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे हा पूर्वनियोजित कट असावा ही शंका उत्पन्न होते. या घटनेत मूळ प्रकरणापासून लक्ष वळविण्यासाठी अनेकांची नावे गोवण्यात येऊन गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. परस्परविरोधी फिर्याद दाखल करून कागदी घोडे नाचविण्याखेरीज काही निष्पन्न होणार नाही.

2 Comments

Click here to post a comment