कर्णधार के एल राहुलला लवकर बरे वाटावे म्हणून प्रिती झिंटाने दिली ‘ही’ प्रतिक्रीया

आहमदाबाद : आपयपीएलमध्ये रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने पंजाब किंग्सचा ७ गडी राखुन पराभव केला आहे. पंजाबने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य ३ गडी गमावत अवघ्या १८व्या षटकात पार केले. ९९ धावांची खेळी करणारा पंजाबचा कर्णधार मंयक अग्रवाल हा सामनावीराचा मानकरी ठरला.

हा सामना सुरुहोण्यापुर्वी पंजाबच्या संघाला मोठा धक्का बसला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार के एल राहुल आजारी असल्याने सामना खेळू शकला नाही. के एल राहुलला अपेंडिक्सचा त्रास होत असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यावर पंजाब संघाची मालकिण प्रिती झिंटाने ट्विट करत तिने राहुलसाठी प्रार्थना केली आहे. या ट्विटमध्ये राहुलचा संघाच्या जर्सीतील फोटोतील शेअर करत तिने लिहिले आहे की, ‘केएल राहुलने लवकर बरे व्हावे म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना करते.’ यावर पंजाब किंग्ज संघाने हृद्याचा इमोजी पाठवत प्रतिक्रिया दिली आहे.

के एल राहुलची समस्या ही शस्त्रक्रिया करुन सोडवली जाउ शकते. त्यामुळे त्याला बायोबबलमधुन बाहेर जावे लागेल. जर असे झाले तर त्याला संघात परतण्यासाठी पुन्हा कोरोना नियमाचे पालन करुन संघात सामील होता येईल. यामुळे राहुल उर्वरीत स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. या सामन्यात पंजाबचा नियमीत कर्णधार के एल राहुल आजारी असल्यामुळे मंयक अग्रवालने नेतृत्व केले होते. यावेळी मंयकने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत सलामीला येत अर्धशतक केले. इतर फलंदाज अपयशी ठरत असताना शेवटच्या चेंडुपर्यंत नाबाद राहत ९९ धावांची खेळी केली.

महत्वाच्या बातम्या