मुंबई: मुंबईत मनोरी येथे समुद्राचे 200 दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया करून गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी1800 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र यावरूनच ‘आप’च्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
“कमी पाऊस आणि कमी भूजल पुनर्भरण क्षमता असलेल्या शुष्क किंवा वाळवंटी हवामानात डिसेलिनेशन प्लांट लोकप्रिय आहेत. मुंबई हे उष्ण कटिबंधीय हवामान क्षेत्रात येते हे कदाचित ठाकरेंना माहीत नसेल.”, असा टोला प्रीती मेनन यांनी ट्वीट करत लगावला आहे.
One more shekchili project by #PappuThackeray. Our paryavaran premi does not know Mumbai is not a desert but is in the Monsoon climate. He is setting up a #DesalinationPlant thru @mybmc without following any process. pic.twitter.com/HGd8NRoq9j
— Preeti Sharma Menon (@PreetiSMenon) May 17, 2022
प्रीती मेनन यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “डिसॅलिनेशन प्लॅन हा घोटाळा असून आदित्य ठाकरेंच्या पाळीव प्रकल्पासाठी हा केवळ विनोदी फसवणूक नाही तर 3520 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. गेल्या आठवड्यात एका हवामान परिषदेत आदित्य ठाकरे यांनी मुंबईत दररोज 400 एमएलडी पाण्याची कमतरता असल्याचे सांगून या जिज्ञासू प्रकल्पाचे औचित्य साधले. गळती आणि पाणीचोरी यामुळे मुंबईला दररोज ८०० एमएलडी गमवावे लागते, हे ठाकरे यांना कदाचित माहीत नसेल. जर त्यांनी यंत्रणा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला तर अतिरिक्त पाणीपुरवठा होईल. हा डिसॅलिनेशन प्लांट दैनंदिन 400 एमएलडी पैकी निम्माही टंचाई पूर्ण करू शकणार नाही, हे नमूद करण्यात ते अयशस्वी ठरले.”
दरम्यान मनोरी येथे 25 ते 30 एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून 200 एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प असणार आहे. यासाठी आंदाजे 1600 कोटी खर्च अपेक्षित असून निर्मिती खर्च 3 ते 4 पैसे लिटर इतका खर्च येणार असल्याचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ प्रस्तावास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी
- “सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?”, अतुल भातखळकरांचा महाविकास आघाडीला सवाल
- ११ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ प्रकरणासंदर्भात CBI ने घेतली पी. चिदंबरम यांची झडती
- “कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा
- IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<