जाणून घ्या गरोदर महिलांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी?

blank

टीम महाराष्ट्र देशा : गरोदरपणी आणि बाळंतपणामध्ये महिलांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. आणि त्या सर्वांची आहाराद्वारे काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत आपण माहिती घेऊया. गरोदरपणी बऱ्याच वेळा महिलांना उलटी त्रास अशा वेळी आहारामध्ये केळी, आक्रोड आणि कणीस अशा गोष्टी आपण आहारात घेतल्या पाहिजे.

लिंबू सरबत, आवळा सरबत घेतल्याने देखील आराम मिळतो. तोंडामध्ये वेलची, आलं, लवंग हे घेतल्याने सुद्धा मळमळ थांबते. गरोदरपणात जर रक्तस्त्राव होत असेल तर तीळ, जव, साखर हे एकत्र करून मधाबरोबर घेतल्याने रक्तस्त्राव थांबण्यास मदत होते.

पिकलेलं केळ, साखर आणि तूप एकत्र करून घेतल्याने सुद्धा रक्तस्त्राव थांबतो. जर अर्धा चमचा सुंटेचा चूर आणि एक चमचा गुळ हे एकत्र करून रोज सकाळ संध्याकाळी घेतलं तर गर्भाशय मजबूत होत. आणि गर्भाशयाचे सर्व दोष मिटतात. गर्भावास्थेमध्ये सौना किंवा स्टीम रूम्सचा वापर आवर्जून टाळावा.

या दिवसांमध्ये सौना किंवा स्टीम रूम्सचे वाढते तापमान पोटातील बाळाच्या दृष्टीने घातक ठरू शकते. किंबहुना या दिवसांमध्ये जास्त तापमान असलेल्या ठिकाणी जाणे टाळून शरीरामध्ये पाण्याची मात्रा योग्य राहील याची काळजी घेत, शरीराचे तापमान सामान्य राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या