UPSC साठी अर्ज भरणाऱ्या इतर मागासवर्गातील उमेदवारांना प्राधान्याने मिळणार नॉन-क्रिमीलेयर दाखला

upsc

मुंबई : संघ लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षांसाठी अर्ज भरणाऱ्या इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचा (नॉन- क्रिमिलेयर) दाखला प्राधान्यक्रमाने उपलब्ध करुन देण्याच्या सुचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानसभेत सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्यावर त्यांनी ही माहिती सभागृहात दिली आहे. दि. 24 मार्च ही युपीएससीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना या मुदतीत नॉन- क्रिमिलेयर प्रमाणपत्रे अपलोड करण्यासाठी उमेदवारांजवळ असणे आवश्यक आहे, असे यावेळी पटोले यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चेत भाग घेतला होता.

अर्थसंकल्प विधानसभेत सादर !

आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला आहे. विविध योजना आणि निधीची घोषणा यावेळी त्यांनी केली आहे. कोरोना काळात राज्याच्या महसुलात मोठी घट झाली असून आपत्कालीन स्थितीतून सावरण्यासाठी राज्याचा खर्च मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीतील वित्तीय तूट ही साहजिकच वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :