अपूर्वाने धारण केलेल्या एकवीरादेवीच्या रूपातील फोटोला पसंती

apurva

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी वेगवेगळया पध्द्तीने नवरात्रीचे स्वागत करत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने यावर्षी एक आगळा-वेगळा प्रयोग केला आहे. दुर्गामातेने महिषासुराचा वध करण्यासाठी या नऊ दिवसात वेगवेगळे अवतार घेतले होते. त्याचप्रमाणे अपूर्वा देवीचे रुप धारण करून सोशल मीडियावर शेअर करत आहे. मागील पाचही दिवस तिने तिचे हे फोटो शेअर केले आहेत. तिने केलेल्या या प्रयोगाला सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच सहाव्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून तिने देवीचे रुप घेतले आहे.

अपूर्वाने सोशल मीडियावरून तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. तसेच गळ्यात हार, सगळा साजशृंगार आणि केसात गजरे घातले आहेत. तसेच तिच्या डोक्यावर देखील फुलांची सजावट दिसत असून त्यावर लिहिले आहे की, ‘नवरात्रीचा सहावा दिवस, रंग लाल, देवी एकवीरा देवी. लोणावळ्याजवळील वेहरगाव, कार्ला गडावरील आई एकवीरादेवी ही आदीशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे.

यासोबतच तिने लिहिले आहे की, मी आणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. अपूर्वा मालिका तसेच चित्रपटात काम केले असून ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता नावाचे पात्र खूप गाजले. तसेच ‘तू माझा सांगाती’ आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकेत काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या