शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर

blank

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता अधिकृतपणे जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला असून प्रत्येक पक्ष आता जोरदार तयारीला लागला आहे. याच तयारीच्या उद्देशाने आज शिवसेनेने आपल्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

शिवसेना – भाजप युती असल्यामुळे शिवसेना महाराष्ट्रातून २३ जागांवर निवडणूक लढवत आहे. तर भाजप २५ जागा लढवणार आहे. शिवसेनेने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली या यादीमध्ये दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून राहूल शेवाळे, उत्तर पश्चिममधून गजानन किर्तीकर, ठाणेमधून राजन विचारे, कल्याण मधून श्रीकांत शिंदे, पालघर मधून श्रीनिवास वनगा, रायगडमधून अनंत गिते, रत्नागिरी सिंधुदूर्ग मधून विनायक राऊत, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगलेतून धैर्यशिल माने यांच्या नावांचा संभाव्य उमेदवारांच्या यादीत समावेश आहे.

नाशिक मधून हेमंत गोडसे, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, शिरुरमधून शिवाजीराव आढळराव-पाटील, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे, यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी, अमरावतीतून आनंदराव अडसूळ, बुलडाणामधून प्रतापराव जाधव, रामटेक मधून कृपाल तुपाणे, परभणीतून संजय जाधव यांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहेत.तर श्रीरंग बारणे, रवी गायकवाड, यांच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.