खा.संजय काकडे यांनी घेतलेल्या दत्तक गावात बेसुमार वाळू उपसा ; प्रशासनाचे दुर्लक्ष.

blank

टीम महाराष्ट्र देशा : खा. संजय काकडे यांनी सांसद आदर्श ग्रामच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सांसद आदर्श ग्राम जांबूत गावातुन बेसुमार वाळू उपसा होताना दिसत आहे. मात्र या गोष्टींकडे ग्राम प्रशासनापासून तहसिलदार पर्यंत सर्वच स्तरातील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे.

सोशल मिडीयावर वाळू उपसा होत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यामुळे जांबूत हे गाव चांगलच चर्चेत आलेलं आहे. स्थानिक गावातील काही तरूणांनी यासंदर्भात आवाज उठवून देखील त्यांच्या मागण्यांकडे स्थानिक ग्राम प्रशासन कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे.

blank

सांसद आदर्श ग्राम जांबूत मध्ये अशा स्वरूपाचे अवैधरीत्या गौणखणिज जर उपसले जात असतील तर इतर गावांनी काय आदर्श घ्यायचा असाही सवाल ग्रामस्थांना पडतो. सध्या शिरूर तालुक्यात वाळू तस्करांचे प्रमाण वाढल्याने अशा स्वरूपात जर बेसुमार उपसा होत असेल तर गावकऱ्यांनी नेमका कुठे न्याय मागायचा असाही सवाल उपस्थित होतोय.

सन 2015 मध्ये खा.संजय काकडे यांनी सदर गाव दत्तक म्हणून घेतलेल आहे . गावातील ठराविक विकास कामे झाली मात्र अशा स्वरूपाचा वाळू उपसा प्रकार हा गावासाठी काळीमा फासणारा विषय आहे. अशी चर्चा सध्या गावातील तरूण तसेच ग्रामस्थांमध्ये होताना दिसत आहे. यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी सबंधित गावातील ग्रामस्थांची आहे.

 

पुण्याची आस्था आणि जाण असणारा खासदार हवा; वंदना चव्हाण यांचा काकडेंना टोला