सांगली घरोघरी जाऊन प्रचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली : मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१८ करिता प्रभाग ८ गट अ , अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून अपक्ष महिला उमेदवार श्रीमती उज्वला बबन वेटम यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यांचे चिन्ह आहे मेणबत्ती. उज्वला वेटम यांनी धरणे आंदोलन, मोर्चा माध्यमातून पीडितांना न्याय मिळवून दिलेला आहे. दलितांवर अन्याय अत्याचार विरोधात सतत आवाज उठवलेला आहे.

उज्वला वेटम यांनी लोकहितार्थ केलेल्या विविध कामांची दखल महाराष्ट्र सरकार तर्फे घेण्यात आलेली असून त्यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन २४ मे २०१७ रोजी गौरविण्यात आले आहे. जातीयवादी व धर्मांध शक्तींना दूर ठेवण्यासाठी व महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभारास आळा घालण्यासाठी प्रभाग ८ अ मधून महिला उमेदवार उज्वला वेटम यांनी आपला अर्ज भरलेला आहे. भारिप बहुजन महासंघ माजी महिला जिल्हा अध्यक्षा म्हणून उज्वला वेटम यांची जिल्ह्यात ओळख आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील मुली सुरक्षित नाहीत – नवाब मलिक

मराठा आरक्षण : सह्याद्रीवरील बैठक ‘फुसका बार’ ठरण्याची शक्यता