fbpx

पीआरसी समितीच्या प्रश्नांना योग्य उत्तरे द्या- संजय शिंदे

sanjay mama shinde

सोलापूर : तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या पंचायत राज समितीच्या निमित्ताने सर्व विभागप्रमुखांनी दक्ष राहावे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अभ्यासपूर्वक माहिती द्या, कामकाजातील काही अडचणी असल्यास खातेप्रमुखांशी चर्चा करून समितीच्या निदर्शनास त्या आणून द्या, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिल्या.

दौऱ्याच्या धास्तीने जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोणत्या विभागाचा कोणता प्रश्न समितीकडून उपस्थित होईल, या भीतीपोटी कार्यालयीन कामकाजात नीटनेटकेपणा आणण्यासाठी सध्या लगीनघाई सुरू असल्याचे दिसत आहे. पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांच्यासह २८ आमदारांचा या समितीत सहभाग आहे.

७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ही समिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. त्यानिमित्त सुटीच्या दिवशी झेडपीसह जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समितींमध्ये प्रशासकीय कामकाज सुरूच होते.