मोदींच्या विजयासाठी मुस्लीम महिलांकडून माहीम दर्गाहमध्ये प्रार्थना

टीम महाराष्ट्र देशा : पुन्हा देशात नरेंद्र मोदी सरकार येण्यासाठी देशभरातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसून प्रचार केला आहे. मात्र आता हा प्रचार सार्थकी लागण्यासाठी दैवी शक्तीला देखील साकडे घालण्यात आलं आहे. मुंबईमधील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी माहिम दर्गाहमध्ये चादर अर्पण करुन प्रार्थना केली आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला असून मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत. त्यामुळे मोदी यांच्या विजयासाठी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांकडून प्रार्थना करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी मतदारसंघातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर जेव्हा वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचवेळी माहीमच्या दर्गाहमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हैदर आझम यांच्या नेतृत्वाखाली चादर अर्पण केली.

यावेळी हैदर आझम म्हणाले की, मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला असून मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत. देशाचा आणखी असाच विकास होण्यासाठी मोदींचे पंतप्रधान होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया आझम यांनी व्यक्त केली.

Loading...