fbpx

शुक्रवारी उपवास केल्यास मोदींचा पराभव होईल; ख्रिश्चन धर्मगुरूंचा अजब सल्ला  

नवी दिल्ली : २०१९ च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असून, गेल्या ४ वर्षाच्या भाजपच्या सत्ता काळात कायदा आणि सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. जर येत्या काळात मोदी आणि भाजपचा पराभव करायचा असेल तर ख्रिश्चनांनी शुक्रवारी उपवास करावा असा अजब सल्ला एका ख्रिश्चन  धर्मगुरूंनी दिला आहे. अनिल काउटो असं त्यांचं नाव आहे. ते  दिल्लीचे आर्चबिशप आहेत.

लोकशाहीला धोका असल्यानं देशासाठी प्रार्थना करा, असं आवाहन दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी केल्यानं चर्चेला उधाण आलंय. या संदर्भात, त्यांनी राजधानीतील सर्व चर्चमध्ये पत्र पाठवलं आहे. या पत्रामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. सध्या देशात राजकीय अशांतता पसरल्याचं चित्र आहे. त्यामुळे लोकशाही राज्यघटना आणि देशातील धर्मनिरपेक्षतेला कुठेतरी धोका निर्माण झाला आहे. जर भाजपचा पराभव करायचा असेल तर २०१९ मधील निवडणुका पाहता, सर्व फादरनी प्रार्थना आणि शुक्रवारी उपवास करावा’, असं आर्चबिशप यांनी पत्रात म्हटलंय.