प्रवीण तोगडिया आज मांडणार हिंदुत्वाचा नवा डाव !

टीम महाराष्ट्र देशा : विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन हाकलपट्टी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया अधिकच आक्रमक झाले आहेत. ते आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये नव्या संघटनेची स्थापना करणार असल्याची माहिती मिळते आहे.

अहमदाबादेत ते आज सकाळी आपल्या नव्या संघटनेचं नाव जाहीर करतील. ही संघटना प्रमुख्याने धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी चालवली जाणार आहे.

14 एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाल्यापासूनच तोगडिया नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे. प्रसंगी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्त्वावरही आपला निशाणा साधण्याचे सोडले नाही.

You might also like
Comments
Loading...