वाशिम : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड वाशिममधील पोहरादेवी गडावर पोहोचले आहेत.जवळपास 15 दिवसांनी ते समोर आले. पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर नॉट रिचेबल असणारे संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले होते.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे चिंता व्यक्त होतेय. याच पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लाईव्ह येत नागरिकांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी मास्क, सतत हात धुणे आणि शारीरिक अंतर राखणे यासह कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे असे असूनही पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली असून कोरोनाच्या सगळ्या नियमांना पायदळी तुडवले आहे.
बेकाबू गर्दीवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली.पोलिसांचे आदेश झुगारत ५० जणांची परवानगी असताना हजारो समर्थकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेचे कार्यकर्ते नेते हेच या गर्दीत मोठ्याप्रमाणावर दिसून आले. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलं आहे.
‘एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असं अवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत हे गंभीर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा,’ अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत’
- भाजप आ.नमिता मुंदडा यांनी केली मागणी, महाविकास आघाडी सरकारने घेतली दखल
- गेल्या काही दिवसांमध्ये घाणेरडं राजकारण सुरु आहे – संजय राठोड
- अरुण राठोड संदर्भात प्रश्न करताच संजय राठोडांनी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या चौकशीकडे केलं बोट !
- फेसबुक आणि ऑस्ट्रेलिया सरकार मधील वाद शमाला फेसबुकची सेवा पूर्ववत