“एसटी कर्मचाऱ्यांबाबतीत सरकारच्या संवेदना गोठल्यात का”- प्रवीण दरेकरांचा सवाल

मुंबई: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दररोज एसटी कर्मचारी आत्महत्ता करत आहेत. या संबंधी भाजपने सभागृहात आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा कुणीही फायदा घेऊ नये असे ते यावेळी म्हणाले आहेत.

“रोज एसटी कर्मचारी आत्महत्ता करत आहेत. मग सरकारची संवेदनशीतला गोठली आहे का? ” असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी राज्यसरकारला विचारला आहे. लवकरच कॅबिनेटची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यासंबंधीचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी केल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या: