‘बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत’

mamata

मुंबई – निवडणूक प्रक्रिया संपताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला.विजयाचा गुलाल उधळण्याची अपेक्षा असताना रक्ताचा सडा बंगालमध्ये पडतानादिसत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. हिंसाचार घडविणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादरकरण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही आता होऊ लागली आहे.

दरम्यान,गेल्या काही दिवसांतराज्यात विविध ११ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप करत भाजपने तृणमूलला लक्ष्यकेले.पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपचे नेते गौरव भाटिया यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली. त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे, हिंसाचारात आपल्या एका कार्यकर्त्यांचीही हत्या झाल्याचा आरोप तृणमूलने केला.

विशेष म्हणजे बंगालविजयानंतर ममता यांच्या कौतुकाचे पोवाडे गाणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासर्व घटनांवर मौन बाळगले आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाऱ्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यांने त्यावर मत व्यक्त केलेले नाही.

‘विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरूअसलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे! बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत! अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या