‘राज्य शासन परप्रांतीयांना अन्नधान्य देऊन शकले नाही म्हणून ते गावाकडे पायी निघाले’

majur

मुंबई : ‘राज्य शासन परप्रांतीयांना अन्नधान्य देऊन शकले नाही , त्यांची व्यवस्था करू शकले नाही म्हणून लोकं पायी निघाल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मीरा भाईंदर मधील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या दरेकर यांनी बैठक घेतली. तसेच यावेळी त्यांनी कोरोना रुग्णालय व अलगीकरण केंद्राची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले की, ‘सत्ताधारी पक्षच राजकारणा सारखा वागतोय असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच यावेळी पुढे बोलताना दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, ‘राज्य शासन व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यानेच अव्यवस्था झालेली आहे. कोणाला कोणाचा मेळ नाही.’ दरम्यान, ‘परप्रांतीयांना माणुसकी म्हणून मोफत एसटी देतो पण मग राज्यातील भूमिपुत्रांना मात्र काही नाही. सत्तेत गेल्यावर भूमिपुत्रांच्या विसर पडला, अशा तिखट शब्दात दरेकर यांनी लक्ष केलं.

महत्वाच्या बातम्या

गब्बर इज बॅक : मोठ्या खेळीसाठी शिखर उत्सुक

मला अशक्य असे वाटत नाही ! विराट कोहलीने आपल्या फलंदाजीबाबत केला मोठा खुलासा

युवराज सिंगने संघ निवड समितीवर केले गंभीर आरोप, म्हणाला…