पंतप्रधान मोदींचे हिंदुत्व निवडणुकीपुरते, हिंदुत्ववादी प्रवीण तोगडीयांचा घणाघात

pravin togdiya

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी आश्वासने दिली मात्र कोणतेही कामे केले नाही, भाजप केवळ निवडणुकीमध्ये राम मंदिराचा मुद्दा पुढे करते, भाजपसाठी राम मंदिर आणि हिंदुत्व हे केवळ निवडणुकीपुरते आहे, असा आरोप आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष आणि मोदी यांनी जुने सहकारी प्रवीण तोगडीया यांनी केला आहे.

Loading...

2001 साली गुजरातमधील बहुतांश आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी मला पाठींबा दिला होता, परंतु आपण नकार दिल्याने मोदी मुख्यमंत्री झाले, असा गौप्यस्फोट तोगडीया यांनी केला आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

तोगडीया म्हणाले की साध्वी प्रज्ञासिंह तुरुंगात असताना भाजपचा एकही नेता तिच्याविषयी बोलत नव्हता, मला देखील बोलण्यापासून रोखले जात होते. आता भाजपनेच साध्वीला लोकसभेची उमेदवारी दिली आहे, त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर देखील त्यांच्यासाठी निवडणुकीपुरता मुद्दा आहे.

दरम्यान, ६० हजारांच्यावर पोलिसांनी बलिदान दिले आहे, त्यामुळेच आपण घरामध्ये सुरक्षित आहोत. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंहने शहीद हेमंत करकरें यांच्या विषयी केलेले वक्तव्य चुकीचे आहे, असही तोगडीया म्हणाले. दरम्यान मोदींनी सीबीआयसारख्या संस्थांवर बंधने लादून देशात अघोषित आणीबाणी लागू केली. अशी टीका त्यांनी केली आहे.Loading…


Loading…

Loading...