श्रीराम मंदिराराबाबत प्रवीण तोगडिया यांच्या संघटनेने केली ‘ही’ मागणी

pravin togadiya

नागपूर : श्रीराम मंदिर हे सनातनी वैष्णव परंपरेचे मंदिर आहे. मठ मंदिर आश्रम चालविणे हे सरकारचे कार्य नाही. ते सरकारच्या ताब्यात आणि नियंत्रणापासून मुक्त असावे, अशी मागणी आंतराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाने केली आहे. यासंदर्भात नागपूरच्या जिल्हा दंडाधिकार्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना विनंती पत्र पाठविण्यात आले आहे.

नोव्हेंबर १९८९ रोजी रामजन्मभूमी मंदिराची पायाभरणी झाली तेव्हा उत्तर प्रदेश सरकारमध्ये एन.डी. तिवारी मुख्यमंत्री होते. राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते. त्यावेळी गृहमंत्री बुटासिंग यांनी या पायाभरणीसाठी लखनऊला जाण्याची परवानगी दिली होती. त्यांच्यामुळे महंत अविद्यानाथ आणि अयोध्याचे महंत रामचंद्र परमहंस, अशोक सिंघल व कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते पायाभरणी झाली. जेव्हा जन्मभूमी मंदिराच्या पायाभरणीचे नाव लिहिले जाते तेव्हा याचा उल्लेख करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे .

सर्व शंकराचार्य रामानंदचार्य ट्रस्टमधील मार्गदर्शक म्हणून वैष्णव परंपरेचे आचार्य आणि आचार्यचे महामंडलेश्वर ठेवले पाहिजे. राम मंदिर निर्माण करण्यासाठी देशातील सर्व प्रदेशांनी उपासना प्रणाली भाषेमध्ये आणि जातीच्या हिंदूंसाठी संघर्ष केला होता. म्हणून ट्रस्टमध्ये ५0१ सहयोगी विश्वस्त केले पाहिजेत ज्यामध्ये अनुसूचित जाती, भारतीय जमाती, सर्व प्रदेश, भारतातील सर्व लोक असावेत. सनातन वैष्णवी परंपरा आणि वेदांवर आधारित, मंदिराची पूजा करण्यासाठी हे आयोजन केले पाहिजे. धर्मनिरपेक्ष बनविण्याचा कोणताही प्रयत्न केला जाऊ नये, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

परिषदेचे नागपूर महानगरातील विदर्भ प्रांतमंत्री किशोर दिकोंडवार यांच्या नेतृत्वात हे विंनती पत्र देण्यात आले. यावेळी सहमंत्री प्रसाद काठीकर, अध्यक्ष वैभव कपूर, उपाध्यक्ष योगेश गायकवाड, कृष्णकुमार पांडे, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष अरविंद डुकरे आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे अध्यक्ष याजेंद्रसिंग ठाकूर, महामंत्री अक्षय मुद्दमवार उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

नाराजीचे कारण ठरलेल्या ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत काँग्रेसला मिळाले स्थान; या नेत्याचे झळकले फोटो

IMP