प्रविण तोगडियांच्या अनुपस्थिती विहिंपची महत्त्वाची बैठक

pravin togdiya

लखनऊ : विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रविण तोगडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न हात असून मला माझ एन्काऊंटर होण्याची भीती आहे. अशी अप्रत्यक्ष मोदी सरकारवर केली होती. त्यामुळे धार्मिक राजकारणात खळबळ उडाली होती. त्यांच्या नाराजीनंतर पहिल्यांदाच विहिंपची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. अलाहाबाद इथं आज संत मार्गदर्शन मंडळ आणि संत संमेलन होणार आहे. मात्र एवढ्या महत्वाच्या बैठकिला प्रवीण तोगडिया उपस्थित नसतील. आणि तोगडियांचा वादग्रस्त मुद्दा देखील चर्चेतून वगळण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात राम मंदिर, गाय गंगा आमि धर्म या विषयावर चर्चा होणार आहे. पण तोगडियांचा वादग्रस्त मुद्दा चर्चेतून वगळण्यात आलाय. चार दिवसांपूर्वी प्रवीण तोगडिया यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मोदी सरकारवर एन्काऊंटरचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांना वगळल्याची चर्चा चालू आहे. तसेच राजस्थान पोलीस प्रवीण तोगडिया यांना ज्या गुन्ह्यासाठी अटक करण्यासाठी गुजरात ला गेले होते. तो गुन्हा 3 वर्षांपूर्वीच सरकारकडून मागे घेण्यात आला असल्याची माहिती राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी दिली. गडियांशी संबंधित प्रकरण 2015 मध्येच मागे घेतले आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे या संदर्भाचे पत्र न्यायालयात पोहोचले नसल्याचेही कटारिया म्हणाले. त्यामुळे पोलीस जरी गुजरातला गेले असले तरी त्यांचा तोगडियांना अटक करण्याचा उद्देश नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ