fbpx

माझ्या संघटनेला बाधा पोहचवली तर मीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल- प्रवीण गायकवाड

sambhaji briged vaad

औरंगाबाद: मी सहा वर्ष संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षपदी होतो. मी जेव्हा राजीनामा दिला त्यानंतर जी कायदेशीर प्रक्रिया व्हायला हवी ती झाली नसून आज ही धर्मादायसंस्थेकडे प्रवीण गायकवाड या नावानेच संस्था रजिस्टर आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या नावाचा मी स्थापन केलेल्या संस्थेचा जर ते गैरवापर करत असतील तर मी निवडणूक आयोगास अर्ज सादर करेल असे प्रवीण गायकवाड आज पत्रकारांशी बोलताना म्हंटले आहेत.

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्याची बैठक आज डॉ बाबासाहेब आबेंडकर संशोधन केंद्रात पार पडली. राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या एका गटाने स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली असून प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे दोन्ही गट समोरासमोर आले आहेत.

माझ्या संघटनेला कोणी बाधा पोहचवली तर मीच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल असेही ते म्हणाले. मराठा सेवा संघाची स्थापना १ सप्टेंबर १९९० ला झाली. मराठा समाज संघटित करणे व उर्वरित बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणे हे ध्येय-धोरण घेऊन निघालेल्या या चळवळीने वेगवेगळ्या ३२ कक्षांच्या माध्यमातून जाळे विणले. या ३२ कक्षांपैकी १ म्हणजे संभाजी ब्रिगेड. संभाजी ब्रिगेडचे पहिले अध्यक्ष म्हणून गायकवाड यांची नियुक्ती झाली होती. धर्मादाय आयुक्तांकडे तशी नोंद करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी प्रवीण गायकवाड यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाचा राजीनामा दिला होता

राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या एका गटाने स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली असून प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे दोन संभाजी ब्रिगेड सध्या पहायला मिळत आहेत. मनोज आखरे आणि प्रवीण गायकवाड असे दोन गट सध्या आमने सामने आले असून दोन्ही गट एकमेकांवर टीका करू लागले आहे. संभाजी ब्रिगेड पक्षाचा फायदा राष्ट्रवादी ऐवजी सेना-भाजपला होणार असल्याचे गायकवाड म्हणाले. तसेच ९०% कार्यकर्त्यांची संभाजी ब्रिगेडने राजकारण करावे या मताचे नाहीत. आजही मीच अध्यक्ष असून त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले.