कॉंग्रेसला उर्मीला मातोंडकरला प्रवेश द्यायला वेळ, मात्र माझ्यासारख्या समाजसेवकासाठी नाही

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप काँग्रेसकडून उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही, स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये असणाऱ्या गटबाजीमुळे नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी, यावर पक्ष नेतृत्वाचे मंथन अजूनही सुरूच असल्याचं दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसकडून इच्छुक असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेत्यांना अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकरला पक्षात घेण्यास वेळ आहे, मात्र अनेक दिवसापासून रांगेत उभा राहिलेला माझ्यासारखा समाजसेवक दिसत नाही, म्हणत गायकवाड यांनी खंत व्यक्त केली आहे. दोन्ही काँग्रेसचे चळवळीशी असलेले नाते तुटताना दिसत आहे. नेत्यांकडून फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेतले जाते. मात्र, त्यांचे विचार दूर केले जात असल्याचं गायकवाड यावेळी म्हणाले.

दरम्यान, आपण आता लोकसभा निवडणूक लढणार नसून काँग्रेसकडे केलेली उमेदवारी मागणी माघारी घेत असल्याचं गायकवाड यावेळी म्हणाले.

1 Comment

Click here to post a comment