महाविकास आघाडी सरकारची ‘हि’ सुडभावना कि प्रेमभावना?- प्रवीण दरेकर

Pravin_Darekar

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. हि मुलाखत तीन भागांमध्ये प्रदर्शित होत असून त्यात पवारांनी अनेक खुलासे केले आहेत. त्यावर भाजपा नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी केलेल्या एका खुलास्यावर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रतिक्रिया देत महाविकासआघाडी साकारला ला प्रश्न विचारला आहे.

संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखती मध्ये शरद पवार यांनी केंद्र सरकारने प्रियांका गांधी यांना निवासस्थान सोडण्यास सांगितलेल्या भूमिकेवर देखील त्यांचे मत मांडले होते. पवार म्हणाले होते, ‘ प्रियांका गांधींचे घर हे केंद्र सरकारने सुड भावनेने काढून घेतले’. यावर ट्विट करत प्रवीण दरेकर यांनी देखील महाविकास आघाडी सरकारला प्रश्न केला आहे. दरेकर म्हणतात, ‘सामनाच्या मुलाखतीत पवार साहेब म्हणतात प्रियांका गांधींचे घर काढून घेतले सुडाने! मग विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना दिलेला बंगला का बरं काढून घेतला?  ६-७ महिने उलटूनही सरकार जाणीवपूर्वक शासकीय निवासस्थान देत नाही…’

भारत – नेपाळच्या मैत्रीत चीनने फूट पाडू नये; पुण्यातील नेपाळी नागरिकांच्या भावना

पुढे दरेकर यांनी, ‘महाविकासआघाडी सरकारची हि सूडभावना आहे कि प्रेमभावना?’ असा सवाल देखील विचारला आहे. तर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी, पाहुयात ते मुलाखत देतात का, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना थेट आव्हान देखील दिल आहे.

संजय राऊतांनी थेट फडणवीसांना दिले आव्हान; पवारांची मुलाखत घ्यावी आणि छापण्याची हिम्मत दाखवावी !